घरदेश-विदेशसेल्फी काढणे पोलिसाला पडले महागात

सेल्फी काढणे पोलिसाला पडले महागात

Subscribe

भोपाल येथील घटना, दारुच्या नशेत न्यायाधिशांच्या खुर्चीवर सेल्फी काढल्याने पोलिस शिपायाला अटक

आजपर्यंत सेल्फीचे वेड असलेल्या लोकांनी वेग-वेगळ्या ठिकाणी सेल्फी काढले आहेत. सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. नेहेमीच युनिक ठिकाणी सेल्फी काढून प्रसिद्ध होणाऱ्यांमध्ये आता अजून एक सेल्फीवेड्या पोलीस अधिकाऱ्याचे आपले नाव जोडले आहे. या अधिकाऱ्याने दारुच्या नशेत चक्क न्यायाधीशांच्याच खुर्चीवर सेल्फी काढल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मध्यप्रदेश येथील भोपाल येथील न्यायालयात ही घटना घडली आहे. राम अवतार रावत (२८) असे या पोलीस शिपायाचे नाव असून तो प्रशिक्षणार्थी पोलीस म्हणून कार्यरत आहे. न्यायिक मॅजिस्ट्रेट के. पी. सिंग यांच्या खुर्चीवर बसून याने विविध प्रकारात सेल्फी काढले होते.

राम अवतार रावतला सेल्फी काढण्याचे वेड होते. फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याची त्याला सवय होती. पोलिसात येण्याअगोदरही पूर्वीचेही अनेक सेल्फी त्याच्या फेसबुकवर आहेत. न्यायाधीशांचे चेंबर उघडे असलेले पाहून राम त्यांच्या खूर्चीवर बसून फोटो काढले. फोटो काढते वेळी न्यायालायचा कारकूनाने बघून ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यावर इतर पोलीस अधिकारी रामला पकडण्यासाठी आले तेव्हा त्याने शिवीगाळ केली. तसेच कोणीच त्याला असे करण्यापासून थांबवू शकत नाही असे तो म्हणाला. रामवर अतिक्रमणाच्या कलमांअतर्गत त्याला अटक केली. अटकेनंतर न्यायालयासमोर त्याला उभे केले असता त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. मात्र त्याला काही वेळेसाठी सेवेतून निलंबीत करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आनंदासाठी काढलेला सेल्फी हा लोकांना महाग पडू शकतो. यापूर्वी एप्रिल महिन्यात जेट एअरवेजच्या विमानातील डॅश बोर्डवर काढलेल्या सेल्फीमुळे काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. सेल्फीमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये भारत हा आघाडीवर आहे. भारतातील ६० टक्के मृत्यू हे सेल्फी काढतानाच झाले आहेत. त्यामुळे सेल्फीची आवड असणे ठीक आहे. मात्र या आवडीमुळे जीव धोक्यात घालणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा स्वतःवर काही संकट ओढवेल असे काहीही करणे धोकादायक ठरु शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -