घरदेश-विदेशभाऊबीजेनिमित्त राजधानीत महिलांना बसमध्ये मोफत प्रवास

भाऊबीजेनिमित्त राजधानीत महिलांना बसमध्ये मोफत प्रवास

Subscribe

राजधानी दिल्लीत भाऊबीजेच्या निमित्ताने महिलांना बससेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीकरांमध्ये भाऊबीजेचा आनंद द्विगुणित झाला आहे.

राजधानी दिल्लीत भाऊबीजेच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आज, ९ नोव्हेंबरच्या दिवशी महिलांना दिल्लीत बससेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीकरांमध्ये भाऊबीजेचा आनंद द्विगुणित झाला. दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने हा निर्णय घेतला असून याबाबत त्यांनी गुरुवारी घोषणा केली.

दिवसभर मोफत प्रावस 

दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज सण साजरा केला जातो. अनेक महिला भावासाठी उपवास ठेवतात. दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये दिल्ली परिवहन निगमच्या एसी आणि नॉनएसी बसमधून प्रवास करताना कोणतेही भाडे आकारले जाणार नाही. त्या दिवसभर मोफत प्रवास करू शकतील. शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांना मोफत प्रवास करता येणार असून डीटीसी दरवर्षी महिलांना मोफत प्रवास करण्याची संधी देते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -