घरट्रेंडिंगभारतातही न्यूझीलंड सारखा हल्ला व्हावा; दुबईतील तरुणाची धक्कादायक कमेंट

भारतातही न्यूझीलंड सारखा हल्ला व्हावा; दुबईतील तरुणाची धक्कादायक कमेंट

Subscribe

न्युझीलंडमध्ये काही दिवसांपूर्वी दोन मशिदींवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ५० नागरिक मारले गले होते. या हल्ल्यानंतर दुबई येथे एका सिक्युरीटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने फेक अकाऊंटद्वारे फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट टाकली होती. न्यूझीलंड येथे झालेल्या हल्ल्यावर आनंद व्यक्त करत भारतातही शुक्रवारी मशिदीवर असा हल्ला व्हावा, अशी कमेंट या तरुणाने फेसबुकवर टाकली होती. या तरुणाला सदर कंपनीने कामावरून काढून टाकले आहे, तसेच त्याची युएईमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दुबईतील ट्रान्सगार्ड नावाच्या कंपनीत हा तरूण काम करत होता. कंपनीने अंतर्गत चौकशी केल्यानंतर त्यामध्ये हा तरूण दोषी आढळला होता. न्यूझीलंड येथील हल्ल्याचा आनंद व्यक्त केल्यानंतर तरुणाने भारतातही असा हल्ला व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. कंपनीने दिलेल्या अधिकृत भाष्य केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “कुणालाही जर वैयक्तिक मते सोशल मीडियावर मांडायची असतील तर त्यांनी ती स्वतःच्या खऱ्या नावाने मांडावीत.” जेव्हा या अकाऊंटचा तपास करण्यात आल्यानंतर तो वापरणाऱ्या तरुणाला तात्काळ कामावरून काढण्यात आले आहे.

- Advertisement -
Rony Singh
तरुणाने केलेली आक्षेपार्ह कमेंट

आरोपी रॉनी सिंह नावाच्या फेक अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट आणि पोस्ट करत होता. न्यूझीलंड मधील क्रिस्टचर्च या शहरात दोन मशिदीवर हल्ला झाल्यानंतर आरोपी तरूणाने एक कमेंट केली होती. त्यात तो म्हणाला होता की, “आज आनंदाचा दिवस आहे. पुलवामाच्या शहिदांना शांती मिळाली असेल आज. देव करो भारतातही दर शुक्रवारी नमाजच्यावेळी असा हल्ला झाला पाहीजे.”

ट्रान्सगार्ड कंपनीचे अधिकारी ग्रेग वार्ड म्हणाले की, सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरावर आम्ही सक्त कारवाई करत आहोत. त्यामुळेच या तरुणाला तात्काळ कामावरून काढण्यात येत आहे. तसेच युएईच्या संबंधित संस्थाकडे पुढील कारवाईसाठी त्याला ताब्यात देण्यात आलेले आहे. दरम्यान या कंपनीने आरोपी तरुणाचे खरे नाव आणि त्याचा देश कोणता? हे जाहीर केलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -