वायु प्रदुषणामुळे ९० लाख लोकांचा मृत्यू

देशभरात प्रदुषणाची समस्या वाढत आहे. प्रदुषणामुळे देशभरात आत्तापर्यंत ९० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Delhi
air pollution in delhi
वायू प्रदूषण

प्रदुषण! ही सध्या एक जागतिक समस्या बनताना दिस आहे. वायु प्रदुषण रोखण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावर देखील सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र हे सारे उपाय आता अपुरे पडतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रदुषणामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देखील लाखोंच्या घरात पोहोचली आहे. यावरून आता वायु प्रदुषणाचं जीवघेणं रूप समोर येत आहे. वायु प्रदुषाणामुळे जगभरात आत्तापर्यंत तब्बल ९० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विश्वास नाही ना बसत? पण ही आकडेवारी सत्य आहे. लैसेंट आयोगानं यासंदर्भातील माहिती सादर केली आहे. दिल्लीमध्ये देखील आता प्रदुषण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. २०१५ पासून देशात तब्बल २५ लाख लोकांना या प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांचा देखील समावेश आहे.

एड्स, मलेरियापेक्षा देखील संख्या जास्त

दरम्यान, जगभरात प्रदुषणामुळे जीव गेलेल्या लोकांची संख्या ही मलेरिया किंवा एड्सनं मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा देखील जास्त आहे. विकसनशील देशांमध्ये प्रदुषणामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या देखील लक्षणीय आहे. दर सहा लोकांमागे किमान एका व्यक्तीचा मृत्यू हा प्रदुषणामुळे होत असल्याचं देखील या आयोगानं नमूद केलं आहे. चीनमध्ये तर तब्बल १८ लाख लोक हे वायु प्रदुषणामुळे मृत्यू पावले आहेत. एकंदरीत आकडेवारी पाहता दुसऱ्या महायुद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांपेक्षा आणि ठार झालेल्या लोकांपेक्षा देखील प्रदुषणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा हा जास्त आहे.

दरम्यान, वायु प्रदुषणामुळे ह्रदयाचा त्रास, श्वसनाचा त्रास आणि इतर आजारांना देखील आमंत्रण मिळते. शिवाय त्वचेच्या आजारांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून केलं जात आहे. बाहेर पडताना चेहरा झाकणे. त्यामुळे किमान श्वसनावाटे मिळणारी हवा शुद्ध असेल. तसेच सकाळी गार्डनमध्ये फिरायला जाणे असे उपाय सुचवले जात आहेत. वाढते औद्योगिकीकरण पाहता प्रदुषणाची पातळी देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here