Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश नव्या पाकिस्तानात इम्रान खान यांचा नाईट मोड, पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊटवर भन्नाट ट्विट्स

नव्या पाकिस्तानात इम्रान खान यांचा नाईट मोड, पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊटवर भन्नाट ट्विट्स

Related Story

- Advertisement -

शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानमध्ये विजेची ग्रीड कोसळल्याची घटना घडली असून त्यामुळे अनेक शहरे अंधारात पडली आहेत, अशी माहिती Dawn या संकेतस्थळानी दिली आहे. रविवारी मध्यरात्री एकाच वेळी मोठ्या प्रमाणातील भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. या पॉवर ब्लॅकआऊटचा फटका हा कराची, रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, मुल्तान आणि इतर रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागला. पण पाकिस्तानातील हा ब्लॅकआऊट अवघ्या काही मिनिटातच टॉप ट्रेंडला आला. युजर्सने पाकिस्तानात इम्रान खान यांनी नाईट मोड सुरू केल्याच्या प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केल्या आहेत.

 

- Advertisement -

इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफाकत यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की नॅशनल ट्रान्समिशन अँड डेस्पॅच कंपनी (एनटीडीसी) सिस्टम ट्रिपिंगमुळे हा ब्लॅकआउट झाला. पाकिस्तानचे ऊर्जामंत्री ओमर अयूब खान आणि त्यांची संपूर्ण टीम ब्रेकडाऊनच्या मुद्यावर काम करत आहे. नागरिकांना लवकरच परिस्थितीबाबत अद्ययावत केले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की “वीज वितरण व्यवस्थेची वारंवारता अचानक 50 वरून 0 वर घसरली ज्यामुळे ब्लॅकआउट झाला.” “वीज उपलब्धतेत घट कशामुळे झाली याचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे खान यांनी सांगतानाच राष्ट्राने संयम ठेवण्याची विनंती त्यांनी केली. “आमच्या सर्व टीम आपापल्या स्थानकांवर पोचले आहेत. ऊर्जामंत्री म्हणून मी वैयक्तिकरित्या पुनर्संचयित करण्याच्या कामावर देखरेख ठेवत आहे. आम्ही आपल्याला वीज पूरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे,” ते पुढे म्हणाले.

 

- Advertisement -

उच्च ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड झाल्याने विजेची यंत्रणा एका सेकंदाच्या तुलनेत 50 वरून शून्यावर आली आणि मंत्रालयानुसार वीज प्रकल्प बंद पडले. पाकिस्तान अंधारात बुडाल्यामुळे या घटनेने देशातील सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विनोदी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्रेकडाउन नंतर लवकरच ‘ब्लॅकआउट’ हा शब्द ट्विटरवर पहाटे 2: 18 पर्यंत 52,800 हून अधिक ट्विटसह टॉप ट्रेंड बनला.

- Advertisement -