लॉकडाऊन-लग्नाचा व्हि़डीओ बघून पती पत्नीत राडा, खाल्ल्या झोपेच्या गोळ्या

mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सगळ्यांनाच घरात राहणे भाग पडले आहे. यामुळे वेळ घालवण्यासाठी सगळेचजण वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद मद्येही लॉकडाऊनमधला वेळ घालवण्यासाठी एक दांपत्य लग्नाचा व्हिडिओ बघत होते. पण त्याचदरम्यान दोघांमधे वाद झाला. यामुळे संतप्त पत्नीने रागात झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

लग्नात महिलेच्या माहेरच्यांनी तिला काही भेटवस्तू दिल्या होत्या. पण तिच्या पतीला मात्र काहीच न दिल्याने तो नाराज होता. व्हिडिओ बघताना त्याला ती आठवण झाली व त्याने आपली ही खंत पत्नीला बोलून दाखवली. यामुळे चिडलेल्या पत्नीने त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपास गेला की पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली. यामुळे अधिकच चिडलेल्या पत्नीने रागात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हे बघताच पतीने तिला रुग्णालयात नेले . याबद्दल तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी पोलिसात जावयाविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. लॉकडाऊनचा वेळ मजेच घालवण्यच्या विचारात असणाऱ्या या नवरोबाची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. तर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here