घरदेश-विदेशकर्नाटकातील म्हैसूरमधील दसरा उत्सव सोहळा

कर्नाटकातील म्हैसूरमधील दसरा उत्सव सोहळा

Subscribe

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’, असं म्हणत देशभर दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सांस्कृतिक वैविध्याचा आढावा विजयादशमी म्हणजेच दसरा हा एक महत्त्वाचा सण असून तो विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये कर्नाटकातील ‘म्हैसूर’ राज्यातील दसरा हा विशेष लक्षवेधी ठरतो. यंदाही म्हैसूरमधील विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे.

- Advertisement -

काय आहे म्हैसूरच्या दसऱ्याचे महत्त्व

हा उत्सव नाडहब्ब या नावाने ओळखला जातो. हा कर्नाटक राज्याचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. पहिले नऊ दिवस नवरात्रीचे असतात. चामुंडेश्वरी देवीने महिषासुराचा वध केला, पापांचा नाश होऊन सुराज्य आले अशी दंतकथा आहे. महिषासुराचा वध झाला त्यावरून या राज्याचे ‘म्हैसूर’ हे नाव प्रचलित झाले. म्हैसूरमधील दसरा उत्सवाला राजे कृष्णराज वडियार, राजे नलवाडी वडियार, राजे चामराज कृष्णदत्त अशी राजेरजवाड्याची परंपरा लाभली आहे. पिढ्यान पिढ्या हा उत्सव राजशाही इतमामाने साजरा केला जातो. पूर्वी राजांची हत्तीच्या अंबारीत बसून संपूर्ण शहरातून मिरवणूक निघत असे. राजे यदुवीर वडियार यांनी आजही ही वैभवशाली परंपरा कायम ठेवली आहे. पूर्वीच्या इतमामात राजवाडय़ातून हत्ती घोडय़ांच्या लवाजम्यासह दसऱ्याची मिरवणूक निघते. २०१० साली या पंरपरेला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -