घरअर्थजगतघरबसल्या SWIGGY सोबत व्यवसाय सुरु करुन कमवा पैसे

घरबसल्या SWIGGY सोबत व्यवसाय सुरु करुन कमवा पैसे

Subscribe

घरबसल्या एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचाराधीन असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जेवण करण्यात आवड असेल, स्वादिष्ट जेवण बनवता येत असेल, तर SWIGGY सोबत व्यवसाय करुन तुम्ही मोठ्या प्रमाणात मोबदला कमवू शकता. यासाठी स्विगीने एक App सुरु केले आहे. ‘स्विगी डेली’ असे या Appचे नाव आहे. सामन्य घरात बनवले जाणारे जेवण या Appद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

उत्तम जेवण करणारे स्विगीसोबत चांगले काम करु शकतात. ऑनलाईन खानावळीचा व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी आहे. शिवाय, यात कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही आहे. चांगले जेवण घरीच बनवून ते स्विगीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवता येणार आहे. ‘स्विगी डेली’ने घरी बनवलेल्या या जेवणाची किंमत ५० ते १०० रुपयांपर्यंत ठेवली आहे. हे App ३ दिवस, ७ दिवस किंवा संपूर्ण एक महिन्यासाठी सब्सक्राईब करता येणार आहे.

- Advertisement -

‘स्विगी डेली’च्या मदतीने संघटित विक्रेते, घरगुती स्वयंपाकी आणि टिफिनची सेवा देणाऱ्यांना घरी बनवलेले जेवण वितरीत करता येणार आहे. स्वस्त दरात लोकांची घराच्या जेवणाची गरज या सुविधेमुळे पूर्ण होणार आहे. ‘स्विगी डेली’ App वर प्रत्येक प्रकारच्या जेवणासाठी ३० हून अधिक पर्याय उपलब्ध असतील. यात Homely, Lunchly, Fig, iDabba आणि Caloriesmart यांसारख्या संघटित विक्रेत्यांना सामिल केले जाणार आहे. शिवाय, Dial a Meal आणि Dailymeals.in सारख्या लोकप्रिय टिफिन सेवांनाही यात सामिल करून घेतले जाणार आहे. Sumita’s Food Planet, Mrs. Ahmed’s Kitchen आणि Shachi Jain अशा एक्सपर्ट होम शेफच्या पदार्थांचाही आस्वाद ग्राहकांना ‘स्विगी डेली’द्वारे घेता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -