घरताज्या घडामोडीदिल्ली - एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

दिल्ली – एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

Subscribe

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे.

एकीकडे कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असताना दुसरीकडे दिल्ली – एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. भूपृष्टापासून ३.३ किलोमीटर अंतरावर हे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाचे हादरे हरयाणा आणि पंजाबमध्येही जाणवले आहेत. या भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिक भितीने घराबाहेर पडले आहेत.

- Advertisement -

दिल्लीला बसला भूकंपाचा धक्का

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. या दरम्यान, अनेकदा दिल्ली – एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी दिल्ली हे भूकंपाचे केंद्र होते.

दरम्यान, २८ मे, गुरुवारी दिल्लीला भूकंपाचा धक्का बसला आहे. २.५ रिश्टर स्केल इतक्या सौम्य तीव्रतेचा भूकंप होता. तर याआधी दिल्लीत १५ मे रोजी भूकंप झाला होता. त्याची तीव्रताही २.२ रिश्टर स्केल इतकी होती. तर १० मे रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. याचे केंद्र दिल्लीतच भूपृष्टभागापासून ५ किलोमीटर अंतरावर होते. त्याच्याही आधी ३ मे रोजी, १३ एप्रिल आणि १२ एप्रिलला दिल्ली-एनसीआर परिसर भूकंपाने हादरला होता.

- Advertisement -

दिल्ली – एनसीआर परिसर हा संवेदनशील मानला जातो. तसेच भूगर्भ शास्ज्ञांच्या मते दिल्ली आणि एनसीआरचा परिसर हा झोन – ४ येतो. तसेच या भागात ७.९ रिश्टर स्केल इतक्या मोठ्या तीव्रतेचाही भूकंप होऊ शकतो. भारतीय उपखंड हा दरवर्षी ४७ मिलीमीटर इतक्या वेगाने सरकतोय. यामुळे आशियाला खंडाला झटके बसत असल्याने टेक्टॉनिक प्लेट्समधील धक्क्यांमुळे भारतात सतत भूकंप येत असतात. पण, भूजल पातळी घसरल्याने या टेक्टॉनिक प्लेट्स कमी झाल्या असल्याचे मत भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -