घरअर्थजगतकोरोना संकटात 'ही' कंपनी देतेय ३० हजार जणांना नोकरी

कोरोना संकटात ‘ही’ कंपनी देतेय ३० हजार जणांना नोकरी

Subscribe

ईकॉम एक्स्प्रेस आगामी सणांच्या हंगामासाठी पुढील काही आठवड्यांत ३०,००० लोकांना तात्पुरता रोजगार देण्याची योजना आखत आहे. ईकॉम एक्स्प्रेस वस्तू पुरवण्यासह ‘लॉजिस्टिक’ सुविधेचं काम करते. सणांच्या वेळी ई-कॉमर्स कंपन्यांवरुन मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या वस्तू लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी नवीन लोक नेमण्याची कंपनीची योजना आहे. ‘लॉकडाऊन’ आणि त्यानंतरच्या ‘ऑनलाईन’ ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीने गेल्या काही महिन्यांत ७,५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. कोविड-१९ पूर्वी कंपनीचे कर्मचारी संख्या सुमारे २३,००० होती.

कोविड -१९ मुळे लोक किराणा सामान, औषध आणि इतर वस्तूंसाठी ई-कॉमर्सकडे वळले आहेत. ईकॉम एक्स्प्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ दीप सिंगला म्हणाले की, “महामारीमुळे ई-कॉमर्स उद्योग वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे. सणांच्या वेळी आमचे ई-कॉमर्स ग्राहक बर्‍याच आकर्षक योजना आखत असतात आणि आम्ही त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही नेमणुका सुरू केल्या आहेत. ही प्रक्रिया १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून सणांच्या काळात ३०,००० तात्पुरती रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.” ऑगस्टमध्ये कंपनीची कर्मचारी संख्या ३०,५०० होती. ते म्हणाले, “मागील वर्षी आम्ही सणांच्या पूर्वी २०,००० लोकांना कामावर घेतले होते. या नोकर्‍या तात्पुरत्या असल्या तरी त्यातील जवळजवळ एक तृतीयांश कायमस्वरूपी झाले आहेत कारण सणानंतरही आपल्याकडे ऑर्डरमध्ये वाढ दिसून येत आहे.”

- Advertisement -

ई-कॉमर्स कंपन्यांचा असा विश्वास आहे की सणांच्या वेळी व्यावसायात अधिक वाढ होईल. त्यांनी क्षमता वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे जेणेकरून ऑर्डरचं अधिक चांगलं व्यवस्थापन करता येईल. पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि वितरण क्षमता वाढविण्यासाठी वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने अलीकडेच ५०,००० हून अधिक किराणा दुकाने जोडली आहेत. त्याचबरोबर Amazon इंडियाने पाच केंद्रे (विशाखापट्टणम, फारुखनगर, मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद) समाविष्ट करण्याची घोषणा केली. तसंच विद्यमान आठ केंद्रांच्या विस्ताराची घोषणा केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -