घरCORONA UPDATEलॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार; १९३० नंतरची सर्वात मोठी मंदी

लॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार; १९३० नंतरची सर्वात मोठी मंदी

Subscribe

२०२० मध्ये जगातील १७० हून अधिक देशांचे दरडोई उत्पन्न कमी होईल, असं आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) क्रिस्टलिना जॉर्जिवा म्हणाल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच देश लॉकडाऊन असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा गंभीर परिणाम होणार आहे. १९३० रोजी ‘द ग्रेट डिप्रेशन’ (महामंदी) नंतरची सर्वात वाईट अवस्था अर्थव्यवस्थेची होणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) हा इशारा दिला आहे. सन २०२० हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी खूप वाईट असणार आहे, असा दावा आयएमएफने केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये १९३० च्या महामंदीनंतरची सर्वात मोठी घसरण दिसून येईल.

१७० देशांमध्ये दरडोई उत्पन्न कमी होणार

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी गुरुवारी सांगितलं की, २०२० मध्ये जगातील १७० हून अधिक देशांचे दरडोई उत्पन्न कमी होईल. १९३० च्या दशकात जगात महामंदी आली होती. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोरोना विषाणूने उद्ध्वस्त झाली आहे. जगभरातील सरकारांनी सुमारे ८ लाख कोटी डॉलर्सची मदत पॅकेजेस दिले आहेत, परंतु ती मदत पुरेशी दिसत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: भारत प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत


महामंदीनंतर सर्वात मोठी घसरण

जॉर्जिवा म्हणाल्या की, या संकटाचा कालावधी अनिश्चित आहे, परंतु हे आधीच स्पष्ट झाले आहे की सन २०२० मध्ये जागतिक वाढीच्या दरामध्ये तीव्र घट होईल. त्या म्हणाल्या, ‘आमचा अंदाज आहे की १९३० मधील महामंदीनंतर सर्वात मोठी घसरण आपल्याला दिसेल.’

- Advertisement -

विकसनशील देशांना अधिक फटका

जॉर्जिवा म्हणाल्या की या संकटामुळे उदयोन्मुख देश आणि विकसनशील देशांना सर्वाधिक त्रास होईल. त्यांना शेकडो अब्ज डॉलर्सची परदेशी मदत लागेल. त्या म्हणाल्या की या विषाणूमुळे लोकांचा बळी जात आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन करावं लागलं. ज्यामुळे कोट्यवधी लोकांचं नुकसान झालं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -