घरदेश-विदेशसईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती

सईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती

Subscribe

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या १३ मालमत्ता जप्त करण्याचे ईडीकडून आदेश देण्यात आले आहेत.

हाफिज सईदनंतर आता हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचे ईडीने आदेश दिले आहेत. सलाउद्दीच्या सर्वमालमत्ता जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. आज दि. १९ रोजी अंमलबजावणी संचालनालयाकडून सईद सलाउद्दीनच्या एकूण १३ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतावर केल्या जाणाऱ्या दहशतवादी कुरापतींसाठी अर्थपुरवठा केला असल्याचे समोर आल्यामुळे त्याच्या सर्व मालमत्तेवर टाच आणली आहे.

अन्य सात जणांवर कारवाई

सलाउद्दीन दशतवाद्यासोबत अन्य सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून १.२२ कोटीची मालमत्ता जप्त करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ज्या अन्य सात जणांवर कारवाई करण्यात आली असून ते सुद्धा दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची ईडीने माहिती दिली आहे. या सर्वांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानामध्ये आश्रयाला

काश्मीरमधील फुटिरतावद्यांना आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम सईद सलाउद्दीन याच्या हिजबुल मुजाहिदीनकडून केले जाते. सलाउद्दीन पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे आश्रयाला आहे. तसेच तो तिथून भारतावरील दहशतवादी कारवायांना रसद पुरवितो, असे ईडीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सलाउद्दीन पाकिस्तानमधील अन्य दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचे पुढे उघट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -