घरदेश-विदेशPMC बँक बुडविणाऱ्या वाधवान बंधूकडे ईडीला सापडले 'घबाड'

PMC बँक बुडविणाऱ्या वाधवान बंधूकडे ईडीला सापडले ‘घबाड’

Subscribe

पीएमसी बँक बुडविणाऱ्या एचडीआयएलने अनेक राजकारण्यांना घर गिफ्ट केले होते. ईडीच्या कारवाईत ही माहिती समोर आली असली तरी त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचे कर्ज बुडविणाऱ्या हाऊसिंग डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईतून ईडीच्या हाती चांगलेच घबाड लागले आहे.

मागच्याच आठवड्यात ईडीने एचडीआयलचे प्रमोटर्स राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याकडून एक खासगी जेट विमान आणि काही महागड्या गाड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर आज ईडीने अलिबाग इथून २२ फ्लॅट असलेले घरावर जप्ती आणळी आहे. तर एक खासगी विमान आणि बोटीची माहिती मिळाली आहे. सध्या या दोन्ही गोष्टी मालदिव समुद्रकिनारी असून लवकरच त्या ताब्यात घेणार आहेत.

- Advertisement -

the enforcement directorate-carried-out-raids

ईडीच्या कारवाईत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. HDIL च्या मालकांनी महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांना उच्चभ्रू परिसरात घरे भेट म्हणून दिली होती. मात्र ईडीने या राजकारण्यांची नावे उघड केलेली नाहीत. वाधवान बंधूशी जवळीक असलेल्या इतर लोकांची संपत्ती शोधण्याचेही काम ईडी सध्या करत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल ४ हजार कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. यामध्ये जंगम मालमत्ता, बचत खाते आणि दागदागिण्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पीएमसी बँकेचा कर्जवाटप घोटाळा

HDIL कंपनी आणि पीएमसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर आहेत. बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांची देखील चौकशी सुरु आहे. तब्बल ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपात भ्रष्टाचार झाला आहे. बँकेचे संचालक आणि जॉय थॉमस यांना या कर्जवाटपाबात पुर्ण कल्पना असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ed raids on hdil

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -