रॉबर्ट वड्राच्या कंपन्यांवर ईडीचे छापे

New Delhi
robert vadra
रॉबर्ट वड्रा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ड वड्रा यांच्या कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने छापे मारले आहेत. हे छापे मुंबई आणि बंगळुरु येथील वड्रा यांच्या सनलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीवर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वड्राच्या दक्षिण दिल्लीस्थित असलेल्या सुखदेव विहार कार्यालयात आज संध्याकाळी छापे टाकले. मात्र तिथे वड्रा उपस्थित नसल्याने त्यांच्या वकिलांशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यानंतर वड्रा यांच्या वकिलांनी आरोप केला की, ही छापेमारी एका षडयंत्राचा भाग असून वड्रा सोनिया गांधी यांचे जावई असल्याकारणाने त्यांना लक्ष्य केले जात आहे.

तर दुसऱ्या बाजुला ईडीच्या अधिकाऱ्यांनी या छापेमारीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. वड्रा यांच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी गेले होते. संरक्षणाच्या बाबतीतील करारातून त्या दोन कर्मचाऱ्यांनी हवालामार्फत पैसे मिळवले आणि परदेशात मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Statement by Shri Suman Khaitan, Advocate 7th December, 20181. Politics of revenge and malicious vendetta has today…

Posted by Robert Vadra on Friday, 7 December 2018

“आम्ही ईडीच्या कार्यालयात ५ डिसेंबर रोजी सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. जवळपास ६०० पानांचे दस्ताऐवज त्यांच्याकडे सोपवले आहेत. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वड्रा यांनी समक्ष येऊन भेटले पाहीजे. वड्रा यांचा फक्त चेहरा पाहण्यासाठी ईडी त्यांना बोलावत आहे का? ईडीचे अधिकारी आमच्या कार्यालयात चुकीचे पुरावे निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे आमच्याच कार्यालयात आम्हाला जाऊ दिले जात नाही”, असा आरोपही वड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.

वड्रा यांचे वकिल पुढे म्हणाले की, “स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीला ईडीने टाळे ठोकले आहे. कुणालाही आतमध्ये जाऊ दिले जात नाही. हा नाझीवाद तर नाही का? हे तुरुंग आहे का? आता या गोष्टीला साडे चार वर्षांचा कालावधी होऊन गेला असून ईडीच्या हाती काहीच लागलेले नाही.”