घरदेश-विदेशकाॅंग्रेसची मतं आणि भाजपाच्या जागा वाढवणार प्रियांका गांधी!

काॅंग्रेसची मतं आणि भाजपाच्या जागा वाढवणार प्रियांका गांधी!

Subscribe

या विशेष सर्वेक्षणाद्वारे, प्रियंका गांंधीच्या राजकारणातील प्रवेशानंतर उत्तर प्रदेशातील चित्र कितपत बदलले आहे आणि त्याचा काँग्रेसला किती जागांसाठी फायदा होणार आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्याचा फायदा पूर्व उत्तर प्रदेशमध्ये डबघाईला आलेल्या काँग्रेस पक्षाला होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे सध्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अलीकडेच राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियांका गांधींमुळे काँग्रेसला पूर्वांचलमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी फायदा होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महाआघाडीचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. प्रियंका यांच्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढू शकते मात्र, त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता कमी आहे, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बुधवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सरचिटणीस पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियांका गांधी यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे. यामुळे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ संपुष्टात आलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, इंडिया टीव्ही-सीएनएक्सद्वारे पूर्वांचलमधील ४३ जागांच्या सर्वेक्षणानुसार सुमारे सर्वच जागांवर काँगेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ दिसत आहे. मात्र, काँग्रेसच्या जागा वाढण्याची फारशी शक्यता दिसत नाहीये. सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला ४, एनडीएला २० आणि महाआघाडीला १९ जागा मिळू शकतात.

- Advertisement -

भाजपाला धक्का नाही

या विशेष सर्वेक्षणाद्वारे, प्रियंका गांंधीच्या राजकारणातील प्रवेशानंतर उत्तर प्रदेशातील चित्र कितपत बदलले आहे आणि त्याचा काँग्रेसला किती जागांसाठी फायदा होणार आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वेनुसार, प्रियंका गांधींच्या आगमनामुळे काँग्रेसच्या मतात वाढ होत असली तरी राज्यात काँग्रेसच्या जागा वाढतील इतपत ही वाढ नाही. त्यासोबतच काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष भाजपाचेही यामुळे मोठे नुकसान होणार नसल्याचे सर्वेक्षणातात दिसत आहे. प्रियंकांमुळे काही जागांवर भाजपाच्या मतात घट होताना दिसत आहे मात्र आधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत या जागांमध्ये आता वाढ जाली आहे.

दरम्यान, प्रियांकांच्या राजकीय प्रवेशामुळे पूर्वांचलमध्ये अमेठी आणि रायबरेलीसह ४ जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो. मात्र, यामुळे महाआघाडीचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जुन्या सर्वेक्षणात महाआघाडीला २६ जागा मिळणार होत्या मात्र, आता त्यांना ७ जागांचे नुकसान सोसावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -