फटाके वेळेतच उडवा; नाहीतर ८ दिवस तुरुंगात जा

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या पाच दिवसांसाठी हा नवीन नियम जारी केला आहे.

Mumbai
Eight day jail for defying SC order on cracker
प्रातिनिधक फोटो

फटाक्यांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. तसंच फटाक्यांच्या आवाजामुळे परिसरातील लोकांना विनाकारण त्रास होतो. हे गंभीर मुद्दे लक्षात घेत सुप्रीम कोर्टाने रात्री १० ते ८ या वेळेतच फटाके उडवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता त्यापुढे जाऊन ८ ते १० या दोन तासांच्या अवधीव्यतिरीक्त फटाके उडवल्यास ८ दिवसांचा कारावस होऊ शकतो, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने फटाक्यांबाबत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ८ दिवसांचा कारावसासोबतच १,२५० रुपयांचा दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो, अशी माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या पाच दिवसांसाठी हा नवीन नियम जारी केला आहे. त्यामुळे आता फटाके उडवताना वेळ मर्यादा ओलांडू न देण्याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणं गरजेचं आहे. अन्यथा संबंधित व्यक्तीला ८ दिवसांचा तुरुंगावास आणि बाराशे पन्नास रुपयांचा दंड भोगावा लागू शकतो.


पाहा: भारत देश ‘ICU’मध्ये; राज ठाकरेंचे दिवाळी स्पेशल व्यंगचित्र

दरम्यान, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी नाशिक शहरासाठीच हा नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा फटाके उडवतेवेशी सतर्क रहाणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी ही बंदी अन्यायकारक असून सण मनाप्रमाणे साजरे करता यायला हवेत अशी प्रतिक्रिया दिली होती, तर काहींनी पर्यावरणाला पूरक असा निर्णय घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं होतं. सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रेत्यांसाठीही काही नियम घालून दिले आहेत.

फाटके विक्रेते तसंच नागरिकांसाठी महत्वाचे नियम:

फटाक्याची लड १० हजारांपेक्षा जास्त लांबीची असू नये

अॅटमबॉम्ब, बटरफ्लाय, तडतडी यासारखे फटाके विकू नयेत

फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी. दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये याची खबरदारी घ्यावी

शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स आणि पेट्रोलपंप या ठिकाणांजवळ फटाके उडवू आणि विकू नयेत

चिनी वा परदेशी फटाक्यांच्या विक्री आणि वापर दोन्ही करु नये

अधिकृत सायलंट झोनमध्ये (शांतता प्रभागात) फटाके उडवू नयेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here