घरदेश-विदेशभाजपला सर्वाधिक कव्हरेज; डीडी न्यूजला आयोगाची नोटीस

भाजपला सर्वाधिक कव्हरेज; डीडी न्यूजला आयोगाची नोटीस

Subscribe

पंतप्रधान मोदींच्या ३१ मार्चच्या मै भी चौकीदार कार्यक्रमाच्या प्रसारणा नंतर काँग्रेसने आयोगाकडे तक्रार केली होती.

भाजप सरकारचे आणि मोदीचे सर्वाधिक कवरेज दाखवल्याने निवडणूक आयोगाने डीडी न्यूजला नोटीस पाठवली आहे. निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसहिता लागू करण्यात आली. मात्र निवडणुकीच्या घोषणे नंतर देखील डीडी न्यूज आणि इतर क्षेत्रिय वाहिन्यांवरुन भाजपला सर्वाधिक कव्हरेज देण्यात आले. काँग्रसने या संबंधी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने डीडी न्यूजकडून प्रक्षेपणा संबंधीचा अहवाल मागितला आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ हा कर्यक्रम सलग एक तास २४ मिनिटे लाइव प्रसारित करण्यात आला होता. यानंतर काँग्रेसने डीडीन्यूजची आयोगाकडे तक्रार केली

काँग्रेसचा आरोप

काँग्रेसनेते कपिल सिब्बल यांनी डीडी न्यूजने आदर्श आचारसंहितेचे उल्लघन केल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे केला होता. ३१ मार्चचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मौ भी चौकीदार’ कार्यक्रम लाइव प्रसारित केला, त्याचप्रमाणे भाजपला सर्वाधीक स्लॉट दिल्याचा आरोप त्यांनी केली होता. यावर आयोगाने राजकीय पक्षांना डीडीने दिलेल्यी टाइम स्लॉटची सगळी माहिती सादर करण्यास सांगितले होते.

- Advertisement -

नोटीसीला उत्तर

आयोगाच्या नोटीसीला उत्तर देताना डीडीन्यूजने हा कार्यक्रम राजकीय रॅली नव्हती, तर एक पूर्व नियोजीत कार्यक्रम होता. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे प्रसारण हे बातमीच्या महत्वानुसार प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात येतो, असे डीडीने आयोगाला सांगितले. त्यावेळी इतर सर्व वाहिन्यांवर ‘मै भी चौकीदार’ कार्यक्रम लाइव प्रसारित होत होता. त्यामुळे या कार्यक्रमाचे त्यावेळचे बातमीचे महत्व लक्षात घेऊन कार्यक्रम प्रसारित केल्याचे डीडीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, डीडीन्यूज भाजपच्या फायद्यासाठी प्रसारण करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपामुळे आयोगाने संपूर्ण टाइम स्लॉटचा अहवाल आयोगाकडे मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतरच त्यानुसार कारवाई संबंधी आयोगाकडून काय ते स्पष्ट केले जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -