आझम खान, मेनका गांधींवरही निवडणूक आयोगाने केली प्रचारबंदीची कारवाई

आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत ७२ तासांची प्रचारबंदी केली असून ही बंदी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे. तसेच, मेनका गांधी यांच्यावर ४८ तासांची बंदी घालण्यात आली आहे.

Mumbai
आझम खान आणि मेनका गांधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर अनुक्रमे ७२ आणि ४८ तासांची बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने अजून एक निर्णय घेतला आहे. भाजपाच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर निदंनीय शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकवल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली असल्याने भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उघडपणे शिवीगाळ केला आहे. तर आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. यामुळे आझम खान यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. या संपुर्ण प्रकरणी त्यांच्याविरोधात भाजपा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.

आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत ७२ तासांची प्रचारबंदी केली असून ही बंदी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे. तसेच, मेनका गांधी यांच्यावर ४८ तासांची बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here