घरदेश-विदेशनिवडणूक आयोगाने केली आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदीची कारवाई

निवडणूक आयोगाने केली आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदीची कारवाई

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार बंदीची कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार बंदीची कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोगाने योगी आदित्यनाथ यांना तब्बल ७२ तास तर मायावती यांना ४८ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. या दोनही नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले असून त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ही प्रचारबंदीची कारवाई केली आहे. उद्या, १६ एप्रिलच्या सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे. त्यामुळे योगी पुढचे तीन दिवस तर मायवती दोन दिवस आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करु शकणार नाहीत. भाषणाच्यावेळी दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

हे आहेत वादग्रस्त वक्तव्य

बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील देवबंद येथील निवडणूक प्रचार सभेत मुस्लिम समुहाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी मुस्लिम समुहातील लोकांकडे मतांची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, मुस्लिम समुहाने त्यांच्या मतांची विभागणी होऊ न देता केवळ महाआघाडीला त्यांच मतं द्यावं. यातून धर्माच्या नावावर मायावती यांनी मतं मागितल्याने त्यांनी नियम मोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपे नेते योगी आदित्यनाथ यांनी एका प्रचार सभेत मायावतींवर निशाणा साधत म्हणाले होते की, जर विरोधकांना अली पसंद आहे तर आम्हाल बजरंग बली पसंद आहे. दोनही नेत्यांना निवडणूक आयोगाने या वक्तव्यांसाठी नोटीस बजावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -