घरताज्या घडामोडीकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला 'आयटम' पडणार महागात!

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला ‘आयटम’ पडणार महागात!

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे ती बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची. या निवडणुकीत राजकीय चिखलफेकीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, सध्या त्याहून जास्त चर्चा सुरू आहे ती मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांची आणि त्यासाठी होणाऱ्या प्रचारसभांची. या प्रचारसभांमध्ये उमेदवारांवर टीका केली जात असताना प्रचार खालच्या पातळीवर उतरल्याचं देखील अनेक ठिकाणी दिसत आहे. या सगळ्यामध्ये सध्या टार्गेटवर आहे मध्य प्रदेश काँग्रेस. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या प्रचारावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याला त्याचा ‘आयटम’ प्रचार महागात पडणार असून त्यासंदर्भात आता थेट निवडणूक आयोगानेच जाब विचारला आहे.

ये क्या आयटम है!

हा सगळा प्रकार आहे काँग्रेसचे मध्ये प्रदेशमधले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबाबतीतला. काही दिवसांपूर्वी कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या डबरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना विरोधी भाजप उमेदवार आणि राज्य मंत्रिमंडळाती एक मंत्री इमरती देवी यांना ‘आयटम’ म्हटल्यामुळे हा वाद सुरू झाला होता. त्यावरून भाजपनं तीव्र आक्षेप घेत टीका सुरू केली. कमलनाथ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोन तासांचं मूक निषेध आंदोलन देखील केलं होतं. खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील कमलनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरीदेखील माझं वक्तव्य वेगळ्या संदर्भात होतं. त्यामुळे त्यावर मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी ठाम भूमिका कमलनाथ यांनी घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने त्यावर आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

kamal nath controvercial statement on imrati devi calls item

कमलनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने त्यांना ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयुक्तांकडून अहवाल देखील मागवला आहे. त्यामुळे या प्रकरणात कमलनाथ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते कमलनाथ?

ये क्या आयटम है! मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांचा प्रचार सुरू होता. याच मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार इमरती देवी (Imarati Devi) निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रचाराच्या भाषणात बोलताना कमलनाथ (Kamal Nath) म्हणाले, ‘सुरेश राजेजी आमचे उमेदवार आहेत. सरळ साध्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाहीत. काय आहे त्यांचं नाव? मी तुम्हाला काय त्यांचं नाव सांगू. तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखता. ये क्या आयटम है’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -