घरदेश-विदेशनिकालापूर्वी ईव्हीएम मशीनची अदलाबदली आणि पळवापळवी ?

निकालापूर्वी ईव्हीएम मशीनची अदलाबदली आणि पळवापळवी ?

Subscribe

ईव्हीएम मशीन संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. ते व्हिडिओ खोटे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन खाजगी गाड्यांतून अनधिकृतपणे दुसरीकडे घेऊन जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर निवडणूक आयोगने स्पष्टीकरण दिले आहे. सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे निडणूक आयोगाने म्हटले आहे. याशिवाय हे सर्व व्हिडिओ खोटे असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हे मतदानासाठी फार महत्त्वाचे मशीन मानले जातात. याच मशीनमार्फत लोक मतदान करतात. मात्र या ईव्हीएम मशीन संदर्भात धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर अजनबी या युजरआडी असेलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका महेंद्रा पिकअप गाडीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन भरले आहेत. ती गाडी पूर्णपणे ईव्हीएम मशीनने भरलेली आहे. काही लोक ते ईव्हीएम मशीन गाडीतून खाली करुन एका दुकानात भरताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार एक व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहे आणि दुकानात मशीन ठेवणाऱ्या व्यक्तीला जाब विचारत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

आम आदमी पक्षाच्या कार्यर्त्यांनेही शेअर केला व्हिडिओ

आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन एका गाडीत दिसत आहे. या व्हिडिओ मार्फत आपच्या कार्यकर्त्याने भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने हे व्हिडिओ खोटे असल्याचे म्हटले आहे. ‘ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एक विशिष्ट अशी यंत्रणा असते. याशिवाय ईव्हीएम मशीनच्या कामकाजा संदर्भातील सगळे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे असून सगळ्या गोष्टी नियोजित आणि सुरक्षित पद्धतीने केले जाते. स्ट्रॉग रुममध्ये कशाप्रकारे ईव्हीएम मशीन ठेवले आहे, याची पाहणी उमेदवारांनी केली आहे. याशिवाय सीपीएफ सुरक्षा तैनात करण्यात आली होती’, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मुंबईत काँग्रेसचे निवडणूक आयोगाला निवेदन

याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राज्य निवडणुक आयोगाच्या मुख्य निवडणुक अधिकार्‍यांची भेट घेतली आहे. ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्या ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी मिलिंद देवरा यांनी केली असून त्यासंदर्भातील त्यांनी एक निवेदन देखील मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -