Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत Elon Musk:एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा पाहून थक्क...

Elon Musk:एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

Related Story

- Advertisement -

टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon musk)यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. इलेक्ट्रिक कार निर्मात्यांच्या शेअरची किंमत गुरुवारी ४.८ टक्क्यांनी तेजीत पाहायला मिळाली. यामुळे मस्क यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना पछाडत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर एवढी आहे. त्यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा १.५ अब्ज डॉलरने अधिक आहे. टेस्लाच्या शेअर किंमतीत सतत वाढ झाल्यामुळे एनल मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

ब्लूमबर्गने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. यामध्ये एलन मस्क यांनी जेफ बेजोस यांना मागे टाकत अग्रस्थानी झेप घेतली आहे. ब्लूमबर्गने जारी केलेल्या यादीमध्ये ५०० अब्जाधीशांचा समावेश आहे. जेफ बेजोस २०१७ पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अग्रस्थानी होते. दरम्यान, एनल मस्क यांनी जेफ बेजोस यांना पछाडत अग्रस्थानी पोहोचले आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर मस्कने आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. एका ट्विटर वापरकर्त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी टिप्पणी केली, “काय विचित्र गोष्ट आहे.”

- Advertisement -

जगात सर्वांसाठी २०२० हे वर्षा सर्वांत वाईट गेलं आहे. मात्र, एलन मस्क यांच्यासाठी गेले १२ महिने हे मस्क यांच्यासाठी खास राहिले आहेत. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक मिळकतीत तब्बल १५० अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. आतापर्यंत ही सर्वाधिक वेगानं झालेली वाढ ठरत आहे. यामध्ये टेस्लाचे महत्त्वाचं योगदान आहे. टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजीमुळे एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.


हेही वाचा – पुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आढळले अजून तीन रुग्ण


- Advertisement -

 

- Advertisement -