घरदेश-विदेशजम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ दहशतवादी ठार; एक जवान जखमी

जम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ दहशतवादी ठार; एक जवान जखमी

Subscribe

कडक बंदोबस्त असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी चकमक सुरू झाली आणि यात दोन दहशतवादी ठार झाले

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या संबोरा भागात सुरक्षा दलांनी रविवारी दोन लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना ठार केले. या कारवाईत सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला असून त्याला सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन सध्या सुरू असून या भागात आणखी अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबोरा परिसरातील दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या परिसराला घेराव घातला. या दरम्यान दहशतवादी शोधण्यासाठी घरोघर शोधमोहीम सुरू करण्यात आली. कडक बंदोबस्त असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी चकमक सुरू झाली आणि यात दोन दहशतवादी ठार झाले. पोलीस सुत्रांनी सांगितले की, मारले गेलेले अतिरेकी लष्करशी संबंधित होते, परंतु त्यांची नावे अद्याप कळू शकली नाहीत. अंधारामुळे ऑपरेशन पुढे ढकलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी पुन्हा ऑपरेशन सुरू झाले असून दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून सुरक्षा बंदोबस्त कडक केला आहे.

- Advertisement -

बीएसएफने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी केला आहे. शनिवारी उशिरा बीएसएफने झीरो लाइनकडे येणार्‍या पाच दहशतवाद्यांना रोखले. यामुळे बीएसएफ जवानांवर दहशतवाद्यांनी सशस्त्र गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -