घरदेश-विदेशहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर

Subscribe

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. काल रात्री ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात चौघांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करण्यासाठी हैदराबाद पोलीस त्यांना गुरुवारी रात्री ज्या ठिकाणी घटना घडली होती त्याठिकाणी घेऊन गेले होते. मात्र, घटनास्थळी तपास सुरु असताना चारही आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, तरीही ते पोलिसांच्या हातून निसटले आणि पळत सुटले. अखेर नाईलाजास्त पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यात चारही आरोपींचा मृत्यू झाला.


हेही वाचा – #HyderabadHorror : हैदराबाद सामुहिक बलात्काराप्रकरणी चौघांना अटक

- Advertisement -

 

- Advertisement -

काय आहे हैदराबाद बलात्कार प्रकरण?

हैदराबादच्या शमशाबाद येथे २७ नोव्हेंबर रोजी चार ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी मिळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर या चारही नराधमांनी पीडितेला जिवंत जाळले होते. या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना ठेचून काढा, अशी प्रतिक्रिया देशभरातून उमटत होती. दरम्यान, याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींना शोधून काढले. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली होती. विषयाचे गांभिर्य पाहून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु करण्यात आला होता. तेलगंणा पोलीस याप्रकरणी आणखी तपास लावत होती. तपास लावण्यासाठीच ते गुरुवारी रात्री चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तिथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांना नाईलाजास्तव त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींनी रचला होता कट

पीडित तरुणी २७ नोव्हेंबर रोजी घरी परतत असताना तिची दुचाकी अचानक मध्येच बंद पडली. त्यावेळेस तिने बहिणीला कॉल करुन दुचाकी बंद झाली असल्याचं सांगितलं. सोबत आपल्याला या ठिकाणी खूप भीती वाटत असल्याचेही तिने आपल्या बहिणीला फोनवरुन सांगितले. पण, पीडितेचे दुर्दैव एवढे की तिचा फोनही बंद झाला. दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले होते. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती. सीसीटीव्ही आणि लोकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हा सर्व प्रकार व्यवस्थित कट रचून करण्यात आला असल्याचे साइबरादाबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनर यांनी सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचे पाहिले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता गाडीचे टायर पंक्चर झाले असल्याचे तिने पाहिले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी मोहम्मद आरिफ मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर शिवा स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवले. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे सांगितले की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -