घरदेश-विदेशलिव्ह इन रिलेशनशिपचा घात; लग्न टाळण्यासाठी तरुणीची हत्या

लिव्ह इन रिलेशनशिपचा घात; लग्न टाळण्यासाठी तरुणीची हत्या

Subscribe

बेपत्ता असलेल्या तरूणीचा मृतदेह रविवारी हैद्राबाद मधील सोरारूम भागात सापडल्याने त्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणीचा मृतदेह रविवारी हैद्राबाद मधील सोरारूम भागात सापडल्याने त्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. हा मृतदेह एका सूटकेसमध्ये सापडला. त्या मृतदेहाचे नाव लावण्या असून तिच्याबद्दलची अधिक माहिती समोर आली नाही. या तरूणीचा मृतदेह पोस्टमार्टमकरिता पाठवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी संशयित आरोपी सुनील कुमार याला अटक करण्यात आले आहे. २०१७ पासून हा आरोपी लावण्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होता.

लग्नाचा दबाव टाकल्याने हत्या

आरसी पूरम पोलिसांनी एएनआयला याघटनेची माहिती देताना सांगितले की, लावण्या ही काही दिवसांपासून बेपत्ता झाली होती. ती २०१७ पासून सुनील कुमारसोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघांची ओळख इंजिनीअरींगचे शिक्षण घेताना झाली होती. सुनीलने लावण्याला सुरुवातीला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यास सांगितले होते. ते लावण्यानेही मान्य केले. पण त्यानंतर लावण्याने सुनीलकडे लग्नाची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा देखील ठरला होता. पण सुनीलने काही कारणास्तव हा साखरपुडा पुढे ढकलला होता. त्यानंतर लावण्या लग्नासाठी सुनीलवर दबाव आणत असल्याने सुनीलने तिला मारण्याचा सापळा रचला असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

लॉजवर गळा दाबून हत्या

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ‘सुनीलने लावण्याच्या आई-वडिलांना असे सांगितले की, त्याला मस्कतला नोकरी मिळाली. असे हे त्याने खोटे सांगितले होतं. पण लावण्याच्या घरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन ४ एप्रिलला ते लावण्या आणि सुनीलला विमानतळावर सोडायला गेले होते. लावण्याचे आई-वडील विमानतळावरून निघून जाताच सुनील लावण्याला शमशाबाद येथील लॉजवर घेऊन गेला आणि तिची गळा दाबून हत्या केली.’

बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल

सुनिलने ५ एप्रिलला लावण्याचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि सोरारूम येथील एका नाल्यात मृतदेह भरलेली सूटकेस फेकून दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुनीलला रविवारी अटक केली. याचवेळी, ४ तारखेपासून आपल्या मुलीचा कोणताचा संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी ७ एप्रिलला ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -