घरदेश-विदेशधक्कादायक...'पबजी'च्या नादात प्यायला 'हे'

धक्कादायक…’पबजी’च्या नादात प्यायला ‘हे’

Subscribe

पबजी हा गेम एका २५ वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. भोपाळमधील छिंदवारा येथे पबजी खेळण्याच्या नादात या तरुणाने पाणी समजून अॅसिड प्यायलाची धक्कादायक घटना घडली आहे.

भारतात ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत आहेत. या खेळांनी आता मनोरंजनाच्या सीमा ओलांडल्या असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेताना दिसत आहे. भोपाळमधील छिंदवारा येथे पबजी या खेळाचे व्यसन एका २५ वर्षीय विवाहीत तरुणाच्या जीवावर चांगलेच बेतले आहे. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे.

नेमके काय घडले?

छिंदवारा येथे राहणाऱ्या एका तरुणाला मोबाईल गेमचे भलतेच व्यसन आहे. उठता-बसता, काम करताना, जेवताना, झोपताना अगदी रसत्यावरुन चालतानाही तो मोबाईलवर पबजी गेम खेळतो. त्याच्या या पबजी व्यसनाला घरातील सगळेच कंटाळले आहेत. काही दिवसांपूर्वी तो घरातील अंगणात मोबाईवर पबजी खेळत होता. खेळण्यात तो इतका दंग झाला की अंगणातील जमीन स्वच्छ करण्यासाठी ठेवलेल्या अॅसिडची बाटली त्याने पाणी समजून उघडली आणि तो घटाघटा प्यायला. त्यांना तात्काळ छिंदवारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा छिंदवारा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांच्या आता प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती छिंदवारा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा – ‘पबजी’ गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम

वाचा – ‘पबजी’ खेळण्यासाठी तरुणाची आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -