घरटेक-वेकभारतात पहिली इंटरनेट कार दाखल

भारतात पहिली इंटरनेट कार दाखल

Subscribe

अ‍ॅपद्वारे कारवर नियंत्रण ठेवणे शक्य

प्रसिद्ध ब्रिटिशकार निर्माता कंपनी एमजी हेक्टर (मॉरिस गॅरेज)ने आयस्मार्ट नेक्स्ट जेन या नावे भारतात एक अभूतपूर्व अशी टेक्नॉलॉजी सादर केली. आयस्मार्ट नेक्स्ट जेन वैश्विक टेक्नॉलॉजी असून, अन्य कंपन्यांच्या भागीदारीतून ती विकसित करण्यात आली आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेनच्या आधारे एमजी हेक्टरने आधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज अशी भारतातील पहिली इंटरनेट कार लॉन्च केली. यात दमदार व्हॉईस अ‍ॅप्लिकेशन आहे, जे क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. अ‍ॅपद्वारे या कारवर लांबूनही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

या तंत्रज्ञानातील बिल्ट-इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे जसजसा वापर वाढत जाईल, तसतसे ही प्रणाली शिकत जाईल आणि अधिकाधिक चांगली होईल. यातील व्हॉईस असिस्ट तंत्रज्ञान हे ‘हॅलो एमजी’ म्हटल्याबरोबर कार्यरत होते. त्यानंतर सुमारे १०० कमांड्स समजून घेऊ शकते. ज्यात खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण करणे, नेव्हिगेशन इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी क्षीण असली तरी हे तंत्रज्ञान काम करू शकणार आहे.

- Advertisement -

आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाईल अ‍ॅपद्वारा चालवली जाते. एमजी आयस्मार्ट अ‍ॅपमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी भारतीय बाजारात अजून आलेली नाहीत. प्रत्येक वेळी अ‍ॅप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही, याची पडताळणी होते. कार मालक दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इंजिन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अ‍ॅप वापरू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -