घरदेश-विदेशप्रजासत्ताक दिनी राजपथावर पहायला मिळाला चिरायू भारत

प्रजासत्ताक दिनी राजपथावर पहायला मिळाला चिरायू भारत

Subscribe

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर संचलनासाठी उपस्थित राहण्यासाठी मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु तरिही  दरवर्षीप्रमाणे संचलनाचा उत्साह पहायला मिळाला.

भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिवस आज दिल्लीच्या राजपथावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यदलापासून ते भारताच्या सर्व राज्यांच्या विविध संस्कृती यावेळी राजपथावर साकारण्यात आली. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संपूर्ण देशभरात प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राजपथावर सकाळी देशाचे प्रतंप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्याचप्रमाणे केंद्रिय मंत्रालयातील अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थित ध्वजारोहण करुन राजपथावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अनेक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राजपथावर होणारे पथसंचलन हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय होता. यंदाही त्याच जोमात पथसंचलनाचा कार्यक्रम पार पडला.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर संचलनासाठी उपस्थित राहण्यासाठी मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु तरिही  दरवर्षीप्रमाणे संचलनाचा उत्साह पहायला मिळाला. या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोरोना काळात लस तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शास्रज्ञ आणि संशोधकांना सलाम करण्यासाठी एक खास चित्ररथ तयार करण्यात आला होता. कोरोना लसीचा चित्ररथ या वेळी पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले. लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांनी या वेळी पथसंचसनाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी महिला अधिकाऱ्यांनीही संचलनाच महत्त्ताचा सहभाग नोंदवला होता. त्याचप्रमाणे भारताच्या लष्कराचे हे संचलन राजपथावर पहायला मिळाले.

- Advertisement -

भारताच्या सैन्यबळाचा अनोखा अंदाज दरवर्षीच पहायला मिळतो. यंदाही राजपथावर भव्य रणगाडे पहायला मिळाले. लष्करात असणाऱ्या क्षेपणात्र, अत्याधुनिक शस्त्रास्रांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. राजपथावर खऱ्या अर्थाने देशाची संस्कृती पहायला मिळते ती म्हणजे चित्ररथ. यंदाच्या चित्ररथात खास आकर्षण ठरले ते म्हणजे उत्तर प्रदेशच्या चित्ररथाचे. आयोद्धेच्या राम मंदिराचा देखावा या चित्ररथातून साकारण्यात आला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची संत परंपराही यावेळी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथातून पहायला मिळाली. देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली नृत्य संस्कृती,वेशभूषा यावेळी राजपथावर पहायला मिळाली.


हेही वाचा – मराठमोळ्या तरुणाने साकारलं प्रजासत्ताक दिनी खास गुगल डुडल

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -