Pfizer Vaccine: युरोपियन युनियनकडून कोरोना लसीच्या वितरणास ग्रीन सिग्नल

युरोपियन युनियनने कोरोना लसीचे ३० कोटी डोस पुरवठा करण्यासाठी Pfizer बायोटेकशी डील करणार

युरोपियन युनियनने कोविड -१९ लशीच्या ३० कोटी डोस पुरवठा करण्यासाठी Pfizer बायोटेकशी डील करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. तर युरोपियन युनियनकडून कोविड -१९ लशीच्या वितरणास मंजुरी मिळाल्याने त्याचे वितरण निष्पक्षपणे झाले पाहिजे, जागतिक आरोग्य संघटनचे (WHO) अध्यक्ष अध्यक्ष टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी असून फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटले आहे. Pfizer कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आमच्या लसीची कोविड -१९ रोखण्याची क्षमता दिसली आहे.

दरम्यान, Pfizer चे क्लिनिकल डेव्हलपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रूबेर यांनी सांगितलं की, आम्ही निकालामुळे खुप उत्साही आहोत. Pfizer आणि त्यांची जर्मन सहाय्यक BioTech कंपनी कोविड १९ ची लस तयार करण्याच्या शर्यतीत आहे.


Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस