घरCORONA UPDATEआलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं....

आलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं….

Subscribe

वेडिंग कंपनीने केला पॅकेजमध्ये बदल

देशातील लॉकडाऊनचा लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टवर परिणाम झाला आहे. कोणी आहे त्या परिस्थीतीत लग्न उरकून घेत आहे. ज्यांना साग्रसंगीत लग्न करायचं आहे त्यांनी मात्र आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली. पण या कोरोनाने लग्नाचा फॉरमॅट बदलला हे नक्की. शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे. कोरोनाने लग्नाचे पॅकेजच बदललं आहे.

 

असं झालं वेडिंग पॅकेज

हॉल,  कॅटरिंग,  फ्लॉवर डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ, फ्लोरल रंगोली डेकोरेशन, ब्रायडल मेकअप अँड ज्वेलरी, पुष्पहार, पंडित इथपर्यंत मर्यादीत असलेल्या पॅकेजमध्ये आता आणखी भर पडली आहे. आता कोरोनामुळे थर्मल स्क्रिनिंग, यूव्ही हँड सॅनिटायझेशन, एन-९५ मास्कची भर वेडिंग पॅकेजमध्ये पडली आहे. त्यामुळे कोरोनाने शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे.

- Advertisement -

वेडिंग कंपनीनेच केला पॅकेजमध्ये बदल

कोरोनामुळे वेडिंग कंपनीने आपल्या पॅकेजमध्ये बदल केले आहेत. काळाची गरज ओळखून वेडिंग पॅकेजमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेडिंग पॅकेजमध्ये आता सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रिनिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. किंबहुना आता याच गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत.

या विषयी बोलताना कंपनीचे सीईओ पन्नगा श्रीनिवासालू म्हणाले की, अनेकांनी आपलं लग्न २०२१ पर्यंत पुढे ढकललं आहे. तर काहींनी घरीच उरकलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागमीनुसार आम्ही आमच्या पॅकेजमध्ये बदल केले आहेत.

- Advertisement -

तर काही कंपन्यांनी तर यापुढे जाऊन कडल कर्टनही ऑफर केलेत. शिवाय ई-इनव्हिटेशन कार्ड डिझायनिंग आणि लग्नाच्या वेब टेलिकास्टची सोयही उपलब्ध केली आहे. त्यातून लोकांची गरज लक्षात घेत इवेंट कंपन्यांनी आपले वेडिंग पॅकेज तयार केलेत.


हे ही वाचा – राज ठाकरेंच्या टीकेनंतर योगींनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -