घरदेश-विदेशVideo: तलावामध्ये लँड झालं विमान

Video: तलावामध्ये लँड झालं विमान

Subscribe

‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचिती नुकतीच एका अपघतादरम्यान आली. न्युझीलंडमध्ये एक प्रवासी विमान रनवेवर उतरण्याऐवजी तलावामध्ये पडलं. रनवेपासून काही अंतर पुढे असलेल्या तलावामध्ये विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. विमान तलावात पडल्यानंतर हळूहळू बुडायला सुरुवात झाली. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून विमानातले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स या अपघातातून सुखरुप वाचले. एअर न्युगिनी कंपनीचं बोईंग ७३७-८०० हे विमान मायक्रोनेशियाच्या वेनो विमानतळावर लँड होणं अपेक्षित होतं. मात्र, पायलटचं नियंत्रण सुटल्याने ते थेट रनवेच्या पुढे गेलं आणि तलावामध्ये अर्ध्यापर्यंत बुडलं. दरम्यान ही घटना घडताच किनाऱ्यावर उपस्थित काही स्थानिक नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली.

लहान लहान बोटींच्या साहाय्याने काही स्थानिक नागरिक तलावमध्ये बुडत असलेल्या विमानाजवळ पोहोचले. त्यानंतर लगेचच त्यांनी विमानातील प्रवाशांना आणि स्टाफला बोटींमध्ये उतरवण्यास सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळे विमानातील ३५ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचे प्राण वाचले. या अपघातात कोणतीही जिवीताहानी झाली नसल्याचं एअर कंपनीनेही स्पष्ट केले. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? यासंबंधी पुढील तपास करणार असल्याचं एअर कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -