घरदेश-विदेशपाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक!

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक!

Subscribe

आयात कंत्राट वाटपाच्या माध्यमातून वैयक्तिक फायदा लाटल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळामध्ये अजून भर घालणारी घटना घडली आहे. पाकिस्तान नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीर अब्बासी यांना अटक केली आहे. नैसर्गिक गॅस पाकिस्तानमध्ये आयात करण्यासाठीच्या कामाचं कंत्राट देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारे पंतप्रधानांना अटक होण्याची पाकिस्तानमध्ये ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे पाकिस्तानमधल्या गोंधळाचं हे आणखीन एक उदाहरण म्हणून त्यावर चर्चा होऊ लागली आहे. अब्बासी यांना अकाऊंटेबिलिटी ब्युरोनं आधी हजर राहाण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते हजर न राहिल्यामुळे अखेर एका पत्रकार परिषदेला जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

का केली अटक?

अब्बासी यांना बजावलेली नोटीस पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने उघड केलं आहे. या नोटिशीनुसार, अब्बासी यांनी आयात व्यापारातील कंत्राट प्रक्रियेमध्ये केलेल्या गैरप्रकारामुळे देशाचं आर्थिक नुकसान झालं आहे. या कंत्राट प्रक्रियेमध्ये भ्रष्ट मार्गांचा वापर करून अब्बासी यांनी फायदा लाटल्याचा देखील दावा या नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. अब्बासी यांना अटक करण्यापूर्वी अगदी काही मिनिट आधी काढण्यात आलेला व्हिडिओ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी ट्वीट केला आहे.

- Advertisement -

या वर्षीच्या एप्रिल महिन्यात अब्बासींना पाकिस्तानी सरकारने प्रवास करण्यास बंदी घातली होती. ऑगस्ट २०१७ ते मे २०१८ अशा अल्पकाळासाठी अब्बासी हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत.


हेही वाचा – ICJ च्या निर्णयावर पाकचे पंतप्रधान इम्रान खानचे ट्वीट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -