घरदेश-विदेशएक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात? जाणून घ्या इतिहास

एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात? जाणून घ्या इतिहास

Subscribe

याआधी २००४, २००९ आणि २०१४ सालच्या एक्झिट पोलमध्ये काय झाले होते?

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आता विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर यायला लागले आहेत. मात्र या एक्झिट पोलवर पुर्णपणे विश्वास टाकता येत नाही. कारण हे एक्झिट पोल निकालाच्या जवळपास जात नाहीत, असा इतिहास आहे. याआधी झालेल्या निवडणुकींच्या एक्झित पोलवर जर आपण नजर टाकली, तर यातील सत्यता आपल्याला कळून येऊ शकेल.

वर्ष २०१४ चे एक्झिट पोलचे अंदाज

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोदी लाटेवर स्वार होऊन २०१४ साली ३३६ जागा मिळाल्या होत्या. मात्र एक्झिट पोलमध्ये फक्त टुडेज चाणक्य यांचाच आकडा खऱ्या आकड्यापर्यंत पोहोचला होता. चाणक्यने एनडीए ३०० हून अधिक जागा जिंकेल असे सांगितले होते. या व्यतिरीक्त एकाही एक्झिट पोलला खऱ्या आकड्यापर्यंत पोहोचता आले नव्हते. चाणक्यने एनडीएला ३४० जागा तर भाजप २९१ जागी विजयी होईल, असे सांगितले होते. त्यापैकी एनडीए ३३६ आणि भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या.

- Advertisement -

एबीपी नेल्सने एनडीएला २८१, तर टाइम्स नाउने २४९ जागा दिल्या होत्या. तसेच सीएनएन-आयबीएन-सीएसडीएस लोकनितीने एनडीए २७२ ते २८० जागांच्यामध्ये राहिल असे सांगितले होते. हेडलाईंस टुडे आणि इंडिया टीव्ही-सी व्होटर यांनी एनडीएला क्रमशः २६१, २८३ आणि २८९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.

वर्ष २००९ चे एक्झिट पोलचे अंदाज

याचप्रकारे २००९ च्या निवडणुकीनंतर सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला होता. सर्व एक्झिट पोल्सनी युपीएकडून एनडीए सत्ता खेचून घेईल असा अंदाज वर्तविला होता. मात्र झाले उलटेच. काँग्रेसप्रणीत युपीएने आपली सत्ता दुसऱ्यांदा अबाधित ठेवली. २००४ साली काँग्रेसचे १४५ खासदार विजयी झाले होते. मात्र २००९ मध्ये ही संख्या वाढू काँग्रेस २०६ वर पोहोचली होती.

- Advertisement -

स्टार न्यूज – एसी नेल्सन यांनी एनडीएला १९७ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. मात्र मिळाल्या फक्त १५९ जागा. तसेच टाइम्स नाउने १८३, एनडीटीव्हीने १७७ आणि डेलाईन्स टुडेने १८० जागा एनडीएला बहाल केला होता. मात्र या सर्वांचे अंदाज त्यावर्षी चुकले होते.

वर्ष २००४ चे एक्झिट पोलचे अंदाज

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २००४ सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उसळी मारून पुन्हा एनडीएचे सरकार येईल, असे सर्व एक्झिट पोल सांगत होते. मात्र त्यावेळी देखील एक्झिट पोल चुकले होते. आउटलुक-एमडीआरए आणि स्टार-सी व्होटरने एनडीए २७५ जागा घेऊन पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र यापैकी काहीच तेव्हा झाले नाही. अन्य काही एक्झिट पोल्सनीही भाजपच पुन्हा सत्तेवर आरूढ होईल, असे सांगितले होते. मात्र तसे काहीही झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -