Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर CORONA UPDATE तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!

तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!

१५ ऑगस्टपर्यंत लस तयार होणार ही मागणी अवास्तव आहे. कोणतीही लस एवढ्या वेगाने तयार केली जात नाही. असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.

Mumbai

कोरोनाच्या या वाढत्या संकटात एक दिलासादायक बातमी समोर आली. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण १५ ऑगस्ट रोजी ही लस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणणं हे शक्य नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

भारतात कोरोनावर लस तयार झाली असून ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. तर भारत बायोटेक व आयसीएमआर तर्फे या लसीचे लाँचिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लस लाँच झाल्यानंतर लगेच या लसीचा वापर कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लस औषध १५ ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध करू देऊ, असं आयसीएमआरनं एका पत्रातून म्हटलं होतं.

मात्र आता आयसीएमआरनं सांगितलेल्या तारखेवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याविषयी बोलताना तज्ज्ञ विनिता बाळ म्हणाल्या, ‘चाचण्या सूरू असलेली लस इतक्या लवकर तयार होणं शक्य नाही. १५ ऑगस्टपर्यंत लस तयार होणार ही मागणी अवास्तव आहे. कोणतीही लस एवढ्या वेगाने तयार केली जात नाही. कारण त्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात.’

तर ‘जी लस तयार करण्यासाठी प्री क्लिनिकल डेव्हलपमेंट चालू आहे, अशा स्थितीत आयसीएमआरच्या पत्रातील दाव्यानुसार ७ जुलैपासून क्लिनिकल चाचणी सुरू करणं अशक्य आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत लस उपलब्ध होऊ शकत नाही.’ असं अनंत भान यांनी म्हटलं आहे.

या आधी लस बनवण्याचा अनुभव

भारत बायोटेकला लस बनवण्याचा पूर्वीचा अनुभव आहे. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव असून पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने या लस तयार केल्या असल्याचे सांगितले जात आहे. करोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही करोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३) ही लस बनवण्यात आली आहे.


हे ही वाचा – खुशखबर! भारतात १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार कोरोनाची पहिली लस!