घरताज्या घडामोडीजम्मू काश्मीर : राजौरीच्या घुसखोरीत २ दहशतवाद्यांचा खात्मा; १ जखमी

जम्मू काश्मीर : राजौरीच्या घुसखोरीत २ दहशतवाद्यांचा खात्मा; १ जखमी

Subscribe

राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला असून यामध्ये दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. तर १ जण जखमी झाला आहे.

एकीकडे कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना दुसरीकडे पाकिस्तानाकडून ‘एलओसी’वर खुरापती सुरुच असल्याचे समोर आले आहे. वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला असून यामध्ये दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला असून यामध्ये एक जण जखमी झाला आहे. सध्या जवानांकडून परिसरात शोधमोहीम राबवली जात असून याबाबत लष्करी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार; उत्तर काश्मीरमधील केरन, मच्छल सेक्टर आणि राजौरीच्या कलला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकाबरोबरच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये दोन जणांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

- Advertisement -

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील रणबीरगड येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर इश्फाक रशीद खान आणि एजाज अहमद यांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक एके-४७ रायफल आणि पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली होती.


हेही वाचा – आज भारतीय भूमीत Rafale Fighter Jet होणार लॅण्ड!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -