घरट्रेंडिंगफेसबुक, इन्स्टाग्राम झाले डाऊन; युजर्स हैराण

फेसबुक, इन्स्टाग्राम झाले डाऊन; युजर्स हैराण

Subscribe

आज सकाळी फेसबुक मेसेंजर क्रॅश झालं होतं. त्यापाठोपाठ काही वेळापूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामही डाऊन झालं आहे. गेल्या काही वेळापासून Facebook आणि Instagram डाऊन झाल्यामुळे जगभरातील युजर्स चांगलेच त्रस्त झाले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरता येत नसल्यामुळे जगभरातील नेटिझन्स हैराण झाले आहेत. गेल्या काही वेळापासून मोबाईल किंवा अन्य ठिकाणी फेसबुक उघडल्यावर ‘Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes’ असा मेसेज येत आहे. दरम्यान, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुकवर फोटो, स्टेटस किंवा व्हिडिओ कोणत्याच प्रकारची पोस्ट अपलोड होत नाहीये. दरम्यान, काही भागात आणि काही सर्व्हर्सना मात्र फेसबुक आणि इन्स्टाग्राम व्यवस्थित सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण गेल्या अर्ध्या तासापासून फेसबुक व इन्स्टाग्राम क्रॅश झाल्याचा मेसेज व्हायरल होतो आहे. त्यामुळे जगभरातील फेसबुक आणि इन्स्टा फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना ना स्वत: एखादी पोस्ट अपलोड करता येतेय, ना दुसऱ्यांनी केलेल्या पोस्ट धड दिसत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या तिनही सेवा क्रॅश झाल्या आहेत.


पाहा: फेसबुक डाऊन झालं आणि पाहा पुढे काय झालं…

रिपोर्ट करणाऱ्या युजर्सना वेगवेगळे Errors 

फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे जगभराती लाखो युजर्सने याविषयी टाईमलाईनवर रिपोर्ट केलं आहे. विशेष म्हणजे रिपोर्ट करणाऱ्या प्रत्येक यूजरला वेगवेगळे Error मेसेज मिळत आहेत. त्यातही काही युजर्स फेसबुक ओपन करु शकतायत पण काहीच पोस्ट करु शकत नाहीयेत. दरम्यान, आज सकाळी फेसबुक मेसेंजर डाऊन झाल्यामुळे त्रस्त झालेले युजर्स, आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम सर्व्हर्स डाऊन झाल्यामुळे चांगलेच हैराण झाले आहेत. याआधीही अनेकदा फेसबुक अशाचप्रकारे डाऊन झाल्याचा प्रसंग घडला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -