घरदेश-विदेशकोट्यवधी फेसबुक युजर्सचा डाटा पुन्हा लीक

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डाटा पुन्हा लीक

Subscribe

संशोधकांच्या म्हणण्यानुसार फेसबुकच्या कोट्यावधी यूजरचा डेटा अमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे.

पुन्हा एकदा फेसबुक आडचणीत येण्याची शक्यता आहे. डेटा लीकप्रकरणी अनेक वेळा फेसबुक आडचणीत सापडली आहेच, पण आता संशोधकांच्या म्हणण्यानुसार फेसबुकच्या कोट्यावधी यूजरचा डेटा अमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे. नक्की किती यूजरचा डेटा त्यात आहे, याची नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.

फेसबुकसाठी काम करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. त्यांनी यूडरचा डेटा अमेझॉन सर्व्हरवर स्टोर केला आहे. हा डेटा सहजपणे कोणाला डाऊनलोड करू शकतो. एका कंपनीनं १४६ गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात ५४ कोटी यूजरच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाउंटच्या नावांचा समावेश आहे. तर दुसऱ्या एका कंपनीनं २२ हजार फेसबुक यूजरचे ‘अनप्रोटेक्टेड’ पासवर्ड स्टोर केले आहेत.

- Advertisement -

सर्व डेटा हा फेसबुक इंटिग्रेशनद्वारे गोळा करण्यात आला आहे. फेसबुक इतर कंपन्यांना एखादे अॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी देते. त्यामुळे युजर्सची माहिती सुरक्षीत राहण्याची खात्री बाळगता येत नाही. अशी माहिती अपगार्डच्या सायबर रिस्क रिसर्चचे डायरेक्टर ख्रिस विकरी यांनी दिली.

‘यूजरचा डेटा सार्वजनिक डेटाबेसवर स्टोर करणे फेसबुकच्या धोरणांविरोधात आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अॅमेझॉनशी संपर्क साधून डेटा हटवण्यात आला. असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -