घरदेश-विदेशभारताच्या निवडणुकांवर फेसबुकची करडी नजर

भारताच्या निवडणुकांवर फेसबुकची करडी नजर

Subscribe

२०१९ च्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुक देशाच्या राजधानीत आपले 'वॉर झोन' सुरु करणार आहे. फेसबुकवर राजकीय प्रचार आणि फेक न्यूजवर लक्ष ठेवण्याचे काम यातून होणार आहे.

निवडणुकीचे वारे देशात वाहायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या वापरावर कोणाचे नियंत्रण नसते. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर फेक न्यूज आणि आक्षेपार्ह मजकूर पसरू नये यासाठी आता फेसबुक सज्ज होणार आहे. २०१९ निवडणुकांच्या पार्श्वभूमीर फेसबुक आपले ‘वॉर रुम’ दिल्लीत स्थापन करणार आहे. सोशल मीडियावर फेक न्यूज आणि राजकीय प्रचारावर लक्ष ठेवण्याचे काम हे वॉर रुम करणार आहे. फेसबुक आपली एक तुकडी भारतात पाठवणार आहे. ही तुकडी २४ तास सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहे. ही तुकडी थेट मेनलो पार्क (कॅलिफोर्निया), डब्लिन आणि सिंगापूर येथील कार्यालयाच्या संपर्कात राहणार आहे.

निवडणुक आयोगही करणार मदत

निवडणूक फेसबुक सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहे. यादरम्यान अनेक फेक अकाऊंटवरून पोस्ट शेअर्स करतात. यावर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकने विशेष तुकडीला भारतात पाठवण्याचे ठरवले आहे. ही तुकडी निवणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तुकडी काम करणार आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे. भारतामध्ये वॉर रुमची सुरुवात लवकरच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -