घरअर्थजगतनव्या वर्षात UPI व्यवहारावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार? काय आहे सत्य, जाणून...

नव्या वर्षात UPI व्यवहारावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

Subscribe

२०२० आता संपत आहे आणि आता नवीन वर्षाची तयारी जोरात सुरू आहे. २०२० वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठी वाईट गेले. दरम्यान, नवीन वर्षात बरेच नियम बदलतील. याबद्दलही आपल्यापर्यंत बातम्या पोहोचतील. परंतु यादरम्यान, एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की नवीन वर्ष २०२१ मध्ये UPI मधून ट्रांझॅक्शन करताना आर्थिक नुकसान होणार आहे. यूपीआय व्यवहार महाग होतील असा दावा केला जात आहे. पण जेव्हा व्हायरल मेसेजची पडताळणी झाली तेव्हा ही बातमी पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. सोशल मीडियावर व्हायरल मेसेजेसमध्ये काय आहे आणि काय दावा केला जात आहे आणि यामगचे सत्य काय आहे जाणून घेऊया.

व्हायरल मॅसेज आणि दावे – पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने व्हायरल मेसेजेस तपासले आहेत. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विट केले आहे की, व्हायरल मॅसेजमध्ये असा दावा केला जात आहे की नवीन वर्षापासून यूपीआय व्यवहार महाग होतील आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सवरून पैसे भरल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

- Advertisement -

PIB Fact Check : पीआयबीच्या टीमने व्हायरल मेसेजबद्दल तपास केला असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही असे अनेक मॅसेज व्हायरल झाले आहेत. त्याचप्रमाणे, युट्यूबवरील व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की केंद्र सरकार ‘महिला शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात ६०,००० रोख रक्कम देत आहे. ज्यावर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळले. पीआयबी टीम म्हणाली, केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नाही आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -