इस्रो प्रमुखांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट

नुकतीच भारताने चांद्रयान - २ मोहिम पार पाडली. या मोहिमेनंतर इस्त्रोप्रमुख के. सिवन आणि इस्त्रोच्या नावाने ट्विटर या समाजमाध्यमावर फेक अकाउंट सुरु करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

New Delhi

इस्त्रोचे प्रमुश के. सिवन आणि इस्त्रोच्या नावाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चांद्रयान – २ या मोहिमेबद्दल अनेक समज-गैरसमज पसरविण्यात येत आहेत. याची दखल घेत इस्त्रोनेच के. सिवन यांचे सोशल मीडियावर कोणतेही अकाउंट नसल्याचे जाहीर केले आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांच्या नावाने ट्विटरवर ५ फेक अकाउंट सापडले आहेत. कोणीतरी दुसरीच व्यक्ती के. सिवन यांच्या नावाने हे अकाउंट चालवत आहे. या अकाउंटला मोठ्या प्रमाणात फॉलोअर्ससुद्धा मिळाले असून त्याद्वारे चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. पैकी काही अकाउंट्सचा घेतलेला आढावा.

fake twitter accounts in the name of isro, chief k sivan on the rise

हेही वाचा – ‘कर्नाटकच्या भाजप प्रमुखांना साधा कॉमन सेन्स नाही’

हे आहेत फेक अकाउंट्स

@Kailasavadivoo, @KaailasavadivoS, @KaailasavadivoS, @OfficeOfSivan, @shivraj_office या नावांनी ट्विटर हॅण्डल चालविण्यात येत होते. याविषयी इस्रोने आमचं एकच अधिकृत अकाउंट असल्याचं स्पष्ट केलं आहे. @isro या इस्त्रोचे अधिकृत अकाउंट आहे. तसेच सिवन यांचंही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट नसल्याचं इस्त्रोनं स्पष्ट केलं. यापैकी काही अकाउंट्स डिलीट करण्यात आले आहेत. तर काही अकाउंट्सवरील फॉलोअर्सची संख्या कमी झाली आहे.