घरताज्या घडामोडीBreaking : कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक

Breaking : कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक

Subscribe

कुख्यात गुंड विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. तेव्हापासूनच पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केल होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून कुख्यात गुंड विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

देवळातून केली अटक

उज्जैनमधील एका देवळात विकास दुबे जाणार होता. याबाबत पोलिसांना खबर मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी देवळाच्या आजूबाजूला सापळा रचला होता. दरम्यान, विकास दुबे देवळात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

दुबेचे ३ सहकारी ठार

दरम्यान, याआधी पोलिसांनी विकास दुबेच्या तीन सहकाऱ्यांना चकमकीत ठार केले आहे. तर बुधावारी विकास दुबेचा डावा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर दुबेलाही ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केले आहे. पोलीस हत्याकांड प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.

- Advertisement -

हरियाणामधील फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये विकास दुबेला पाहण्यात आले होते. मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथील हॉटेलवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. चौकशी केली असता पोलीस पोहोचण्याआधीच विकास दुबेने हॉटेलमधून पळ काढला असल्याची माहिती त्याने दिली होती. पण, अखेर पोलिसांना विकास दुबेला अटक करण्यात यश आले आहे.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात २४ तासांत ६,६०३ कोरोनाबाधितांची नोंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -