घरदेश-विदेशउत्पन्न वाढीसाठी चक्क पिकांवर शिंपडली दारु!

उत्पन्न वाढीसाठी चक्क पिकांवर शिंपडली दारु!

Subscribe

पिकांचे उत्पन्न वाढावे यासाठी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांकडून पिकांवर दारु शिंपडण्याचा वेगळा प्रयोग केला जात आहे. किटकनाशके, खतपाणी यापेक्षा दारु शिंपडण्याचा प्रयोग अधिक खर्चिक आहे.

उत्पन्न वाढावे यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. चांगले आणि उत्तम दर्जाचे पिक यावे यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र, शेतकरी यासाठी कुठला प्रयोग करतील याचा नेम नाही. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आता तर चक्क पिकांवर दारु शिंपडण्याचा प्रयोग सुरु केला आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील शेतकरी हा आगळावेगळा प्रयोग करीत आहेत. परंतु, त्यांच्या या प्रयोगात काहीही तथ्य नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, दारु शिंपडल्याने पिंकाची गुणवत्ता दर्जेदार बनते.

हेही वाचा – दारु सोडण्याचे औषध घेत असाल तर सावधान

- Advertisement -

यावर कृषी तज्ज्ञ काय म्हणाले?

शेतात पिक भरपूर यावे, यासाठी उत्तर प्रदेशचे शेतकरी आपल्या शेतामधील पिकांवर दारु शिंपडत आहेत. दारु शिंपडल्याने पिकांचे उत्पन्न वाढेल असा त्यांचा समज झाला आहे. यावर कृषी अधिकाऱ्यांनी यात काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी असे प्रयोग करु नये, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या प्रयोगामुळे मातीवर दूरगामी परिणाम पडू शकतो, असे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शिवाय, दारुमुळे पिकांवर काहीही चांगला परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. पिकांवर दारु शिंपडणे यास कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याचे कृषी तज्ज्ञ म्हटले आहेत. किटकनाशकांपेक्षा दारुचा शिडकाव करणे महाग पडणार आहे. शिवाय, त्याचा फायदाही तसा काही होणार नाही. उलट, यामुळे मातीवर दूरगामी परिणाम होतील, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे असले कुठलेही प्रयोग न करण्याचे आवाहन कृषिी अधिकाऱ्यांकडून करण्यात  आले आहे.


हेही वाचा – दारुच्या नशेत बडबडले, खुनाच्या गुन्ह्यात पकडले गेले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -