घरदेश-विदेशFarmers Protest: 'संयुक्त किसान मोर्चा'ची आज दुपारी १ वाजता बैठक

Farmers Protest: ‘संयुक्त किसान मोर्चा’ची आज दुपारी १ वाजता बैठक

Subscribe

या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता

केंद्र सरकराने लागू केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीत दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप जारी आहे. दरम्यान या शेतकरी आंदोलनाचा आज ५३ वा दिवस असून आज दुपारी १ वाजता ‘संयुक्त किसान मोर्चा’ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडसंदर्भात देखील नियोजन करणार असून आज सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडणार आहे.

तीन केंद्रीय मंत्र्यांसोबत शुक्रावारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले. तर केंद्र सरकार कायदे रद्द न करता त्यामध्ये काही बदल करण्याच्या मागणीवर ठाम होतं. साधारण चार ते पाच तास चाललेल्या बैठकीत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येणारी पुढील बैठक १९ जानेवारी रोजी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीला अद्याप वेळ असला तरी त्या दिवशी तसंही विशेष सुरक्षा व्यवस्था असते. तर २६ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर रॅलीबाबत अद्याप शेतकरी संघनांनी कोणतीही पूर्ण योजना सांगितलेली नाही, तसेच पोलिसांकडूनही कोणती माहिती दिली जात नाही. अशा परिस्थितीत प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. यासह १९ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या बैठकीत शेतकरी केंद्र सरकारशी चर्चा करतील. तर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी असे सांगितले की, सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीकडे आम्ही चर्चेसाठी जाणार नाही यासह चर्चेसाठी आमचं प्राधान्य एमएसपी असेल असेही त्यांनी म्हटले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -