घरदेश-विदेश‘दुष्काळात तेरावा महिना' अशी अवस्था

‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था

Subscribe

डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरची मशागत महागली

कन्नड:दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागात जसे नागरिकांना इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणले आहे, तसे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. आधीच दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि पावसाळ्याच्या तोंडावर मशागत करावी, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरची मशागत महागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा…’अशी अवस्था झाली आहे.

‘इकडे आड तिकडे विहीर’

- Advertisement -

या इंधन दरवाढीमुळे शेतकरी जसा चिंताग्रस्त झाला आहे, तसे कृषी माल वाहतूकदारांसाठीही हे अडचणीचे बनले आहे. गेल्या वर्षापासून डिझेलच्या दरामध्ये तब्बल १३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची मशागत महाग झाली आहे, तर शेतीमाल वाहतुकीचाही दर वाढल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ या कात्रीत बळीराजा सापडला आहे.

तासाला ५०० रुपये ट्रॅक्टरचे भाडे

- Advertisement -

ऐन पेरणीपूर्वीचा हंगाम सध्या सुरू आहे, त्यासाठी उन्हाळ्यात शेतीची नांगरट व कोळपणी करण्यात शेतकरी गुंतला आहे. तब्बल ८० टक्के शेतकरी सध्या ट्रॅक्टरचा वापर मशागतीसाठी करतात. गेल्या वर्षी एका तासाला ४०० रुपये असलेला ट्रॅक्टर नांगरणीचा दर यंदा ५०० रुपये इतका झाला आहे. साधारणतः एक एकर नांगरणीला तीन ते चार तास लागतात. त्यामुळे, एका एकराचा खर्च डिझेल दरवाढीने १५०० ते २००० रुपये इतका झाला आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात शेतकरी साठवलेला माल बाजारात आणतात. मात्र, मालवाहतूकदारांचेही वाहतुकीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. नांगरणी व कोळपणी करण्यासाठी शेतकऱ्याला गेल्या वर्षापेक्षा २२०० ते २६०० रुपये इतका अधिकचा भार उचलावा लागत आहे. डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरची मशागत महागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -