मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या वडिलांनी ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Father of Microsoft co-founder Bill Gates dies at 94
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या वडिलांनी ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील विल्यम एच गेट्स यांचे निधन झाल्याचे समोर येत आहे. त्यांनी वॉशिंग्टमधील राहत्या घरी सोमवारी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अल्झामयरने पीडित होते. बिल गेट्स यांच्या कुटुंबानी याबाबत मंगळवारी माहिती दिली. बिल गेट्स यांचे वडील एक वकील आणि फिलोन्थोपिस्ट होते. तसेच ते मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक देखील होते.

या दुःखद बातमीबाबत बिल गेट्स यांनी स्वतः ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘जगातील लोकांवर माझ्या वडिलांची बुद्धीमत्ता, औदार्य, नम्रपणा आणि सहानुभूतीचा प्रभाव होता.’

बिल गेट्स यांच्या वडिलांचा बिल आणि मिलिंड गेट्स फाऊंडेशनच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये हातभार होता. आता ही संस्था जागतिक आरोग्यासाठी कार्य करत आहे. तसेच ते सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी देखील प्रयत्नशील होते. तसेच राज्य आयकर अमेरिकेतील धनाढ्य लोकांवर लादण्याचा अपयशी प्रयत्नही त्यांनी केला होता.


हेही वाचा – चीनची १६०० भारतीय कंपन्यांमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक; केंद्राची माहिती