घरदेश-विदेशआंध्र प्रदेश : कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला आग; ७ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला आग; ७ जणांचा मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशात हॉटेलला भीषण आग लागली असून यामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कोविड सेंटर असलेल्या हॉटेलमध्ये ही आग लागल्याचे समजते. आज, रविवारी सकाळी ही घटना घडली. यासंबंधीचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले असून या दुर्घटनेत ३० जणांचा वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्यास सुरूवात केली.

- Advertisement -

या सेंटरमध्ये एकूण ४० जण असून त्यामध्ये ३० कोरोना रुग्णांचा आणि १० केअर सेंटरच्या स्टाफचा समावेश आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या हॉटेलचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या आगीवर मोठ्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आगीत जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. सध्या ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -