Video: ‘हावडा’ रेल्वे स्थानकात मध्यरात्री आग!

पश्चिम बंगालच्या 'हावडा' रेल्वे स्थानकात गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. मात्र, सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Mumbai
fire at howrah railway station
शॉर्ट सर्किटमुळे कोलकात्याच्या हावडा रेल्वे स्थानकावर लागलेली आग (सौ.-ANI)

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील हावडा रेल्वे स्थानकात गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. हावडा स्थानकातील इलेक्ट्रिक बोर्डामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे रेल्वे स्थानकात एकच गडबड उडाली. मात्र, मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे हावडा स्थानकामध्ये लोकांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहीनी झाली नाही. दरम्यान आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि काही वेळातच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग पसरली नाही आणि सुदैवाने मोठा अपघात टळला. दरम्यान रेल्वे पोलिसांकडून या घटनेची अधिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ANI ट्वीटर सौजन्याने

पाहा या घटनेचा व्हिडिओ : 

व्हिडिओ सौजन्य- युट्यूब

हेही वाचा : कोलकात्यात सापडले घातक पदार्थ!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here