Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सुरतमधील रघुवीर मार्केटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या ५७ गाड्या घटनास्थळी दाखल

सुरतमधील रघुवीर मार्केटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या ५७ गाड्या घटनास्थळी दाखल

Related Story

- Advertisement -

गुजरातमधील सुरत येथील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५७ गाड्या दाखल झाल्याअसून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज पहाटेच्या सुमारास रघुवीर मार्केटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगीचा भडका उडाला, असे सांगितले जात आहे. रघुवीर मार्केट १० मजल्यांचे असून सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

रघुवीर मार्केट हे कपड्यांच्या मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. सुरत गुजरातच नाही तर देशभरातील प्रसिद्ध असे व्यापारी केंद्र आहे. रघुवीर मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -