चीन नाही ओ..तर ‘या’ देशाने पसरवला कोरोना जगभर, डॉक्टरांनी केला दावा!

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १७  नोव्हेंबरला सापडला होता.

coronavirus-outbreak-india-inc-scales-the-wall-as-china-cant-mask-its-pain
प्रातिनिधीक फोटो

आजपर्यंत आपण चीनमध्ये डिसेंबर २०१९ ला कोरोनाव्हायरसचा निर्माण झाला आणि जगभर पसरला असे मानत होतो. पण कोरोनाचा पहिला रुग्ण हा चीन सापडला नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण चीन नाही तर फ्रान्समध्ये सापडला असं डॉक्टरांच म्हणणं आहे.  उत्तर-पूर्व फ्रान्सच्या कॉलमारमधील अल्बर्ट श्वित्जर हॉस्पिटलमधील डॉ. माइकल श्मिट यांच्या टीमने दावा केला आहे की  नोव्हेंबरलाच युरोपमध्ये कोरोनाने आपले पाय रोवायला सुरूवात केली होती.

२५०० पेक्षा जास्त रिपोर्टचा अभ्यास

हा दावा करण्याआधी डॉक्टरांनी २५०० पेक्षा जास्त रुग्णांच्या एक्स-रे रिपोर्टचा अभ्यास केला. त्यातील २ एक्स रे रिपोर्ट असे होते, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणे होती. १६ नोव्हेंबरला एका व्यक्तीचा एक्स-रे काढण्यात आला होता. ज्याचा रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याला कोरोना संक्रमण होतं हे स्पष्ट होतं. याच व्यक्तीचा दुसऱ्या दिवशीही एक्स-रे काढण्यात आला, त्यात संक्रमणाची लक्षणं दिसून आली. मात्र त्यावेळी डॉक्टरांना कोरोनाबाबत माहिती नव्हती.

१६ नोव्हेंबर, २०१९

१६ नोव्हेंबर २०१९ ला कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं. डिसेंबरमध्ये काढण्यात आलेल्या एक्स-रे मध्ये एकूण १२ लोकं अशी होती,  ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं स्पष्ट दिसत होती. मात्र कोरोनाची माहिती नसल्यामुळे “फ्रान्सच नाही तर युरोपच्या बहुतेक देशांमध्ये आणि अमेरिकेत ज्या रुग्णांना पेशंट झिरो मानण्यात आलं ते पेशंट झिरो नव्हते आणि त्यामुळे प्रकरणं ट्रॅक झाली नाहीत आणि वाढत गेली” ही डॉक्टरांची टीम आता ऑक्टोबरमधील एक्स – रेची देखील तपासणी करते जेणेकरून खऱ्या पेशंटपर्यंत पोहचता येईल.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १७  नोव्हेंबरला सापडला होता, त्या रुग्णाची तशी नोंद करण्यात आली आहे. चीनी प्रशासनाने अशा २६६  संशयित कोरोना रुग्णांची माहिती मिळवली आहे,  ज्यांना गेल्या वर्षी हा आजार झाला होता. डिसेंबरअखेर चीनच्या एका डॉक्टराने या नव्या आजाराबाबत सांगितलं. त्यावेळी जवळपास १८०  कोरोना रुग्ण सापडले.


हे ही वाचा – नवऱ्यानं केलं तिसरं लग्न, दुसऱ्या बायकोने ‘असा’ घेतला भन्नाट बदला!