ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये चकमक; ५ नक्षलवादी ठार

मलकानगिरीतील कोलीमेडा येथे चकमक अजूनही सुरु असून आतापर्यंत ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी ५ शस्त्र आणि एक ग्रेनेड जप्त केले आहे.

Odisha
Gadchiroli police
गडचिरोली पोलीस

ओडिशामध्ये नक्षलवाद्यांच्याविरोधात जवानांकडून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनला मोठे यश आले आहे. ओडिशाच्या मलकानगिरीतील कोलीमेडा येथे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी चकमक झाली. या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजून चकमक सुरुच आहे. या चकमकी दरम्यान ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचा देखील समावेश आहे.

नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक

सोमवारी सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील कलिमेदा भागामध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले. या चकमकीमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक अजूनही सुरु असून नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून प्रत्यूत्तर दिले जात आहे. जवानांकडून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान ही घटना घडली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी ५ शस्त्र आणि एक ग्रेनेड जप्त केले आहे.

दंतेवाडामध्ये झाली होती चकमक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबरला मोठा हल्ला केला आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपुर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवानांसह दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. छत्तीसगड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूरदर्शनची ३ जणांची टीम रिपोर्टिंगसाठी जात होती. त्यांच्यासोबत जवानांची टीम सुध्दा होती. दरम्यान निलावाया भागातील जंगलामध्ये लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले तर दूरदर्शनचा एका कॅमेरामनचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here